डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

निकालांच्या आधी राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग

राज्य विधानसभा निवडणुकांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर, महायुती आणि महाविकास आघाडीतील राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूंकडच्या नेत्यांनी  सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. निकालांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या सागर बंगल्यावर आज भाजपा नेत्यांची बैठक झाली. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी भाजपा प्रदेश कार्यालयातल्या बैठकीत घडामोडींचा आढावा घेतला. 

 

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या उमेदवारांची आज बैठक होत असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीत नाही तर महाराष्ट्रातच होईल, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.  महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात उद्धव ठाकरे यांनी उत्तमरित्या राज्य चालवलं आणि म्हणूनच आताही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार बनवण्याचा प्रयत्न करु, असं ते म्हणाले. अपक्ष आणि छोट्या पक्षांकडूनही चाचपणी सुरु आहे. 

 

निकालानंतर सरकारस्थापनेचा दावा करणाऱ्यांसोबत राहण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केला आहे. असाच निर्णय बसपा अध्यक्ष मायावती यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा