डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात विविध लक्षवेधी मतदान केंद्र

राज्यात विविध ठिकाणी लक्षवेधक मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. त्यात महिला विशेष, युवक विशेष, दिव्यांग विशेष, हरित अशा विविध प्रकारची मतदान केंद्र आहेत. काही मतदान केंद्रांवर आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

 

राज्यातली पहिल्या क्रमांकाची मतदार रविता पंकज तडवी हिनं नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रथम क्रमांकाच्या मणिबेलीतल्या केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. वडाळा मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेनं हरित मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या पहिल्या पाच मतदारांना रोप आणि फूल देऊन त्यांचं स्वागत झालं. बीड जिल्ह्यातल्या परळी इथं महिलांना मतदानाला प्रोत्साहित करण्यासाठी तात्पुरत्या पाळणाघरांची व्यवस्था करण्यात आली आहे. 

 

१०३ वर्षं वयाचे स्वातंत्र्यसैनिक जी. जी. पारिख यांनी मुंबईतल्या मलबार हिल मतदारसंघात मतदान केलं. मुंबईत कुर्ला इथं कर्करोगग्रस्त ज्येष्ठ महिला मतदाराने प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. श्रीलंकेत राहणाऱ्या मीनल रेणावीकर यांनी श्रीलंकेतून येऊन सकाळी मतदानाचा हक्क बजावला. गडचिरोलीत १११ वर्षांच्या फुलमती बिनोद सरकार यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. 

 

पुण्याच्या चितोडे वाणी समाज प्रगती प्रतिष्ठानतर्फे समाजबांधवांना त्यांच्या मूळ गावी, म्हणजेच जळगाव इथं जाऊन मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मोफत बसची व्यवस्था करण्यात आली आहे आणि या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा