डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मतदानाचं प्रमाण वाढण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे विविध उपाययोजना

२०१४च्या विधानसभा निवडणुकीत ६३ टक्क्यांपेक्षा जास्त आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात ६१ पूर्णांक १ दशांश टक्के मतदानाची नोंद झाली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६१ पूर्णांक ३३ शतांश टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाचा हक्क बजावण्यात महिलांपेक्षा पुरुष आघाडीवर असल्याचा सर्वसाधारण कल आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. 

 

यंदा मतदानाचं प्रमाण वाढावं यासाठी निवडणूक आयोग, स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था यांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. सर्वत्र मतदान केंद्रांची माहिती देणाऱ्या मतदान चिठ्ठ्या निवडणूक आयोगानं घरोघरी पोहोचवल्या आहेत. मुंबईत एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान केंद्र असल्यानं विविध रंगांनी ही केंद्र सजवली आहेत आणि मतदान चिठ्ठ्यांवरही त्या रंगांचे स्टिकर लावले आहे. त्यामुळं मतदारांना त्यांचं मतदान केंद्र शोधणं सोपं होईल. मतदान केंद्रावर कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे, मेट्रोनं अतिरीक्त वेळासाठी सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मुंबईत दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांना त्यांच्या घराजवळून मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी मोफत वाहन व्यवस्थेची सोयही आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा