डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात २८८ मतदार संघांमध्ये १५८ पक्षांकडून २,०५० उमेदवार रिंगणात, उर्वरित २,०८६ अपक्ष

राज्यातल्या २८८ मतदार संघांमध्ये १५८ पक्षांकडून २ हजार ५० उमेदवार रिंगणात आहे. उर्वरित २ हजार ८६ अपक्ष आहेत. सर्वाधिक २३७ उमेदवार बहुजन समाज पार्टीनं उभे केले असून वंचित बहुजन आघाडीचे २०० उमेदवार रिंगणात आहेत. भाजपानं १४९, मनसेनं सव्वाशे, काँग्रेसनं १०१ उमेदवारांना निवडणुकीत उतरवलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून ९५, शरद पवारांकडून ८६, एकनाथ शिंदेंकडून ८१, अजित पवारांकडून ५९ उमेदवार नशीब आजमावत आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाकडून ९३, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून ३२, प्रहार जनशक्तीचे ३८, माकपाचे ३, MIMचे १७, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे ४, जनसुराज्य शक्तीचे ६, शेकापचे १८, समाजवादी पार्टीचे ९ आणि भाकपाचे २ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा