डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विधानसभा निवडणुकीसाठी यंदा ४,१३६ उमेदवार रिंगणात

विधानसभा निवडणुकीसाठी यंदा ४ हजार १३६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात ३ हजार ७७१ पुरुष, ३६३ महिला आणि २ तृतीयपंथी आहेत. 

 

बीड जिल्ह्यात माजलगाव मतदारसंघात सर्वाधिक ३४ उमेदवार रिंगणात आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ३०३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्वात कमी १७ उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. उत्तर नांदेड मतदारसंघामध्ये ३३, जालन्यात भोकरदनमध्ये ३२, बीडमध्ये ३१ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. नंदूरबार जिल्ह्यातल्या शहादा मतदार संघात सर्वात कमी ३ उमेदवार रिंगणात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमध्ये आणि रायगड जिल्ह्यात महाडमध्ये प्रत्येकी ५ उमेदवारांचं नशीब उद्या मतपेटीत बंद होईल. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही उद्या मतदान होणार आहे आणि त्याठिकाणी १९ उमेदवार पात्र ठरले आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा