२० तारखेला होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघांसाठी तसंच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. राज्यात ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार असून; त्यांच्यासाठी १ लाख ४२७ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातल्या २८८ जागांसाठी ४१३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदानची वेळ असून राज्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावं असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केलं आहे. या निवडणुकीसाठी मुक्त वातावरणात, निष्पक्ष आणि शांततेत मतदान पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे.
Site Admin | November 19, 2024 8:51 AM | Maharashtra Assembly Election 2024