डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पक्ष किंवा उमेदवारांकडून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंवर लक्ष ठेवणार असल्याचा निवडणूक आयोगाचा इशारा

दिवाळीच्या काळात पक्ष, इच्छुक किंवा उमेदवारांकडून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंवर आयोगाचं आणि पोलिसांचं काटेकोर लक्ष असणार आहे. यासंदर्भात सर्वसामान्य नागरिक C-VIGIL ऍपवर तक्रार नोंदवू शकतात, अशी माहिती अतिरीक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी दिली. मुंबईत आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते.  निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यात काल काही शासन आदेश जारी झाले असतील किंवा काही जाहिराती प्रसिद्ध झाल्या असतील त्यांची चौकशी करू असंही कुलकर्णी म्हणाले. 

 

या निवडणुकीत उमेदवाराला कमाल ४० लाख रुपये खर्च करता येईल. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर खर्चाची मोजणी सुरू होईल पण अर्ज भरण्यापूर्वी काही प्रचारसाहित्य खरेदी केलं असेल तर त्याचा खर्चही यात धरला जाईल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी दिली. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा राज्यात ६९ लाखांहून अधिक मतदार वाढले आहेत. तसंच मतदान केंद्रांची संख्या साडे ३ हजारांनी वाढल्याचं ते म्हणाले. ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यंगत्व आणि ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना अर्ज भरुन दिल्यावर घरुन मतदानाची सोय मिळेल, असं त्यांनी सांगितलं. मुंबई, पुणे, ठाण्यात गृहनिर्माण संस्थांमध्ये १ हजार १८१ आणि झोपडपट्टीत २१० मतदान केंद्र उभारली आहेत. या निवडणुकीसाठी ६ लाख कर्मचारी आणि पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा