विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आतापर्यंत सुमारे ४० लाख वीजदेयकांवर संदेश प्रकाशित झाले आहेत. २७ लाख बँक ग्राहकांना मतदान करण्याचं आवाहन एसएमएसद्वारे केलं आहे. संकल्पपत्रांचं वितरण, स्टिकर्स, होर्डिंग, डिजिटल स्क्रिन तसंच बॅनरद्वारा जनजागृती केली जात आहे. निवडणुकीसाठी मुंबईत ६५ मतदार मदत केंद्रं उपलब्ध केली आहेत.
Site Admin | November 15, 2024 7:31 PM | Maharashtra Assembly Election 2024