डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अखेरच्या दिवशीही उमेदवार याद्या जाहीर

भारतीय जनता पक्षानं आज जाहीर केलेल्या यादीनुसार उमरेडमधून सुधीर पारवे, तर मीरा भाईंदरमधून नरेंद्र मेहता यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षानं माढा विधानसभा मतदारसंघातून अभिजित पाटील, मुलुंडमधून संगीता वाजे, मोर्शी मधून गिरीश कराळे, पंढरपूरमधून अनिल सावंत, मोहोळमधून राजू खरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात  आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं भाजपमधून आलेल्या तृप्ती सावंत यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. 

दुसरीकडे उमेदवारीसाठी इच्छुक पण संबंधित राजकीय पक्षाकडून तिकिट न मिळालेले काही उमेदवार नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. पालघरमधे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक श्रीनिवास वनगा यांना माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली. काल संध्याकाळपासून ते बेपत्ता झाले असल्याचं आमच्या पालघरच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पोलीस वनगा यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, भाजपाचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी बोरीवलीतून, माजी आमदार अतुल शहा यांनी मुंबादेवी तर घाटकोपर पूर्वमधून भाजपाच्याच प्रकाश मेहता यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा