विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शक्तिप्रदर्शन करत कामठी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साकोलीतून अर्ज भरला. संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर पश्चिममधून, भाजपाच्या हेमंत रासने यांनी पुण्याच्या कसबा पेठ मतदारसंघातून, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनी वडगांव शेरीतून उमेदवारी अर्ज दाखल केला.
काँग्रेसचे गोपाल अग्रवाल यांनी गोदिया विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. मिलिंद देवरा यांनी वरळी मतदारसंघातून, धुळे शहर मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल गोटे यांनी, तसंच एमआयएमचे फारुख शाह यांनी, काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी नागपूर पश्चिमधून, श्वेता महाले यांनी चिखलीतून, शिवसेनेचे दीपक केसरकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन तेली यांनी सावंतवाडी मतदारसंघातून अर्ज दाखल केला.
अकोला पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसचे साजिद खान तसंच वंचित बहुजन आघाडीकडून झिशान हुसैन यांनी अर्ज दाखल केला. बेलापूरमधून भाजपाच्या मंदा म्हात्रे, दिंडोशीतून संजय निरुपम, रत्नागिरी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाळ माने, अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून प्रहारचे सुगत चंद्रिकापुरे, इस्लामपूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे निशिकांत पाटील, तासगाव-कवठे महांकाळमधून संजय पाटील, महाड मधून भरत गोगावले आणि नागपूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.