डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत निधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार निवडणूक अधिसूचना येत्या २२ तारखेला जारी होईल, २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, अर्जांची छाननी ३० ऑक्टोबरला होईल, तर ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.  २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल. नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही याच वेळापत्रकाप्रमाणे होणार आहे. 

 

राज्यात २८८ पैकी २५ मतदारसंघ अनुसूचित जाती आणि २९ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. राज्यात विधानसभेसाठी एकूण १ लाख १८६ मतदान केंद्रं असतील. त्यापैकी २९९ मतदान केंद्रांचं व्यवस्थापन दिव्यांग, ३८८ मतदान केंद्रांचं व्यवसाथापन महिला पाहतील. ५३० आदर्श मतदान केंद्रं उभारली जाणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर सुमारे ९०० ते १ हजार मतदार असतील. त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी, शौचालय, दिशादर्शक फलक, रॅम्प किंवा व्हीलचेअर, मदत केंद्र, पुरेसा प्रकाश आणि मंडप व्यवस्था ठेवण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत. रांगांमध्ये थोड्या थोड्या अंतरावर बसण्याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही आयोगानं केल्या आहेत. मुंबई, ठाणे आणि पुण्यातल्या काही मतदारसंघांमध्ये ४५ टक्क्यांपेक्षा कमी मतदानाची नोंद होते. या भागात मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा