डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ईव्हीएम अथवा स्ट्राँग रूमबाबत कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये – निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे

मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूमला त्रिस्तरीय सुरक्षाकवच देण्यात आलं असून, शंभर मीटर परिसरात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे ईव्हीएम अथवा स्ट्राँग रूमबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवेवर विश्वास ठेवू नये, असं निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी सांगितलं. चिपळूणमध्ये मतदानयंत्रात छेडछाड करण्याच्या हेतूने काही जण थांबले असल्याची तक्रार एका पक्षकार्यकर्त्याने दाखल केली होती त्या संदर्भात लिगाडे यांनी खुलासा केला.

नवी मुंबईतल्या ऐरोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांच्यावर काल कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. भाजपचे माजी नगरसेवक शंकर मोरे यांचा मुलगा जयेश मोरे याला मारहाण केल्याची तक्रार मोरे यांनी केली होती, त्यावरून कदम यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 

धुळे शहरात मतदान यंत्र घेऊन जाणारे वाहन अडवून निवडणूक अधिकाऱ्याला धमकी देणाऱ्या तरुणासह ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळ्यातल्या अभय कॉलेजजवळ काल ही घटना घडली होती.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा