डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या टपाली मतमोजणीला विविध केंद्रांवर सुरुवात

विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या टपाली मतमोजणीला विविध केंद्रांवर सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातल्या वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे, कसबा मतदारसंघातून भाजपचे हेमंत रासने, हडपसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे तर कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे चंद्रकांत पाटील हे टपाली मतमोजणीत आघाडीवर आहेत. 

जळगाव ग्रामीणमधून शिवसेनेचे गुलाबराव पाटील आघाडीवर आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे आघाडीवर आहेत. 

बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार टपाली मतमोजणीत आघाडीवर आहेत. पुरंदर मधून शिवसेनेचे विजय शिवतारे, आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून शरद पवार पक्षाचे देवदत्त निकम आघाडीवर आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सुनील कांबळे टपाली मतदानाच्या पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत.

मुंबई उपनगरातील वांद्रे पूर्व इथून राष्ट्रवादी काँग्रेसचे झिशान सिद्दीकी, कुलाब्यातून भाजपचे राहुल नार्वेकर, वाशीम जिल्ह्यातून भाजपचे श्याम खोडे तर गुहागरमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव आघाडीवर आहेत.  

नंदूरबार जिल्ह्यात नवापूर विधानसभा मतदारसंघात टपाली मतदानात काँग्रेसचे शिरीष नाईक आघाडीवर आहेत. कोल्हापूर उत्तरमधून शिवसेनेचे राजेश क्षीरसागर आघाडीवर आहेत. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदार संघात होत असलेल्या टपाली मतमोजणीत देवेंद्र फडवणीस आघाडीवर आहेत. वाशिम विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिद्धार्थ देवळे आघाडीवर आहेत. तर कारंजा विधानसभा मतदारसंघात टपाली मतमोजणीत भाजपच्या सईताई डहाके आघाडीवर आहेत. 

श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे भाऊसाहेब कांबळे आघाडीवर आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे दीपक केसरकर, कुडाळ-मालवण मतदारसंघातून शिवसेनेचे निलेश राणे आघाडीवर आहेत. 

बुलढाणा मतदारसंघात टपाली मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत शिवसेनेचे संजय गायकवाड आघाड़ीवर आहेत. बीड मतदारसंघात टपाली मतमोजणीच्या पहिल्या फेरी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर योगेश क्षीरसागर आघाडीवर आहेत. धुळे शहर मतदारसंघात टपाली मतमोजणीच्या पहिल्या फेरीत भाजपचे अनुप अग्रवाल आघाडीवर आहेत. 

यवतमाळमधील पुसद मतदारसंघात पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रनील नाईक आघाडीवर आहेत. परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे आघाडीवर आहेत. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून भाजपचे राम भदाणे आघाडीवर आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा