महाराष्ट्रातल्या जनतेनं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीला विक्रमी यश दिलं तर काँग्रेस आणि महाविकास आघाडीला कधी नव्हे इतक्या कमी जागा मिळाल्या.
आतापर्यंत १९६ जागांचे निकाल हाती आले आहेत. एकूण २८८ पैकी २२८ जागा महायुतीतल्या प्रमुख पक्षांना मिळतील असं चित्र आहे. त्यातला विचार करता भाजपाला ८० जागांवर विजय मिळाला असून ५० जागांवर हा पक्ष आघाडीवर आहे. शिवसेनेला ३९ जागांवर विजय मिळाला असून १८ जागांवर हा पक्ष आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ३३ जागांवर विजय मिळाला असून ८ जागांवर हा पक्ष आघाडीवर आहे.