विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये पोस्टल मतदान आणि मतदान यंत्रातलं मतदान यात तफावत आहे असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी त्यांनी काही मतदारसंघातल्या उमेदवारांना मिळालेल्या मतदानाची आकडेवारी उदाहरणादाखल समोर मांडली. ही माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून घेतल्याचं सरदेसाई म्हणाले.