सोलापूर जिल्ह्यात माळशिरसमधल्या मारकडवाडीतली मतदान प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राबवली गेली असं सांगत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची फेरमतदानाची मागणी फेटाळली आहे. मारकडवाडीतल्या ग्रामपंचायतीने मतदान प्रक्रियेची खात्री करण्यासाठी पुन्हा एकदा फेरमतदानाच्या मागणीचा ठराव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवला होता. मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटवर होणारं मतदान योग्य आहे की नाही, याची मॉकपोलव्दारे चाचणी दोन्ही बाजूच्या उमेवारांच्या उपस्थितीत झाली. त्यावरचे आक्षेप तेव्हा नोंदवले नाहीत तेव्हा मतदानाची पुन्हा खात्री करण्यासाठी शासकीय यंत्रणा अथवा ईव्हीएम मशीन वापरता येणार नाही असं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. निकाल लागून दोन आठवडे झाल्यामुळे फेरमतदानही घेता येणार नाही, असा खुलासाही त्यांनी केला आहे.
Site Admin | December 1, 2024 7:05 PM | Maharashtra Assembly Election 2024