डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रांवर अधिकारी-कर्मचारी रवाना

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रांवर अधिकारी-कर्मचारी रवाना झाले आहेत. 

नागपूरमध्ये सर्व मतदान केंद्रावर कर्मचारी आणि सुरक्षा बलं पोहोचली आहेत. भंडाऱ्यात एसटी महामंडळान १३४ बस दिल्या आहेत. ५ हजार २३६ निवडणूक कर्मचारी आणि १४०० पोलीस कर्मचारी तैनात आहेत. गोंदियात बाराशे ८५ मतदान केंद्रावर निवडणूक साहित्य पोहोचलं. 

नाशिक जिल्ह्यात ४ हजार ९२२ मतदान केंद्रासाठी २७ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

धाराशिव जिल्ह्यात निवडणूक प्रक्रियेसाठी सोळाशे पोलीस, साडे चौदाशे होमगार्ड तैनात आहेत. धुळ्यात १८ लाखापेक्षा जास्त मतदारांना मतदान माहिती चिठ्ठीचं वाटप झालं. 

नांदेडमध्ये लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीसाठीची तयारी पूर्ण झाली आहे.

बीड जिल्ह्यात दोन हजार ४१६ मतदान केंद्रांपैकी बाराशे ९ केंद्रावर वेब कास्टिंग होणार आहे. मतदान यंत्र घेऊन जाणाऱ्या वाहनावर जीपीएस यंत्रणा लावली असून पहिल्यांदाच चक्री ऍपचा वापर केला जाणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. 

यवतमाळ जिल्ह्यात अडीच हजारपेक्षा जास्त केंद्रावर सोळा हजारपेक्षा जास्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 

जालना जिल्ह्यात सुरक्षेसाठी चार हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यात उद्या २० लाखापेक्षा जास्त मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात तीन हजार ७३८ मतदान केंद्रावर १८ हजार कर्मचारी तैनात आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा