विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात सत्तास्थापनेबाबत विविध पातळ्यांवर चर्चा सुरु आहे. महायुतीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या विधिमंडळ पक्षांच्या नेत्यांची निवड झाली आहे. शिवसेनेच्या गटनेतेपदी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेपदी अजित पवार यांची निवड कालच झाली. मात्र भाजपा विधिमंडळ पक्षाची नेतानिवड अद्याप बाकी आहे. भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक आज होणार असून ती झाल्यावर मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय होईल, असं अजित पवार यांनी आज सातारा जिल्ह्यात कराड इथं सांगितलं. माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी उपप्रधानमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड इथल्या त्यांच्या स्मृतिस्थळावर पवार त्यांनी आदरांजली वाहिली.
Site Admin | November 25, 2024 6:42 PM | Maharashtra Assembly Election 2024