डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विधानसभा निवडणुकीत अनेक प्रस्थापित नेत्यांना पुन्हा एकदा जनतेचा कौल मिळवण्यात यश

या विधानसभा निवडणुकीत अनेक प्रस्थापित नेत्यांना पुन्हा एकदा जनतेचा कौल मिळवण्यात यश आलं. भाजपाचे विजयकुमार गावित नंदुरबारमधून, गिरीश महाजन जामनेरमधून, देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून, श्रीजया चव्हाण भोकरमधून, संतोष दानवे भोकरदनमधून, अतुल सावे औरंगाबाद पूर्वमधून, सुहास कांदे नांदगांवमधून, रवींद्र चव्हाण डोंबिवलीतून, गणेश नाईक ऐरोलीतून, राम कदम घाटकोपर पश्चिममधून, आशीष शेलार वांद्रे पश्चिममधून, राधाकृष्ण विखे-पाटील शिर्डीतून, नितेश राणे कणकवलीतून विजयी झाले आहेत. शिवसेनेचे आमश्या पाडवी अक्कलकुव्यातून, गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीणमधून, संजय राठोड दिग्रसमधून, अब्दुल सत्तार सिल्लोडमधून, संजय शिरसाट औरंगाबाद पश्चिममधून, दादाजी भुसे मालेगाव बाह्यमधून, राजेंद्र गावित पालघरमधून, एकनाथ शिंदे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून, राहुल नार्वेकर कुलाब्यातून, शहाजी पाटील सांगोल्यातून, उदय सामंत रत्नागिरी, किरण सामंत राजापूर, निलेश राणे कुडाळ, दीपक केसरकर सावंतवाडीतून जिंकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ येवल्यातून, नरहरी झिरवाळ दिंडोरीतून, सना मलिक अणुशक्तीनगरमधून तर हसन मुश्रीफ यांना कागलमधून मतदारांनी कौल दिला आहे.

काँग्रेसचे नितिन राऊत नागपूर उत्तरमधून, विजय वडेट्टीवार ब्रह्मपुरीतून, ज्योती गायकवाड धारावीतून, अमित देशमुख लातूर शहरमधून, विश्वजीत कदम पलूस-कडेगावमधून विजयी ठरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड मुंब्रा-कळवा इथून, आदिती तटकरे श्रीवर्धनमधून, दिलीप वळसे पाटील आंबेगावमधून, अजित पवार बारामतीतून, रोहित पवार कर्जत-जामखेडमधून, जयंत पाटील इस्लामपूरमधून, रोहित पाटील तासगांव-कवठे महांकाळमधून विजयी झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनंत नर जोगेश्वरी पूर्वमधून, वरूण सरदेसाई वांद्रे पूर्वमधून, महेश सावंत माहिममधून, आदित्य ठाकरे वरळीतून, अजय चौधरी शिवडीतून, भास्कर जाधव गुहागरमधून जनतेचा कौल मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. याशिवाय स्वाभिमानी पक्षाचे रवी राणा बडनेरामधून तर समाजवादी पक्षाचे अबू आझमी मानखुर्द-शिवाजीनगरमधून विजयी झाले आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा