राज्यात आता प्रचारसभा, मिरवणुका आयोजित करता येणार नाही. आयोजित केल्या तर आयोजक आणि सहभागी होणारे अशा दोघांवर गुन्हे दाखल होतील. यात दोन वर्षापर्यंत तुरुंगवास अथवा दंड अथवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. या कालावधीत जाहिराती करतानाही नियमांचं पालन करण्याचे निर्देश आयोगानं उमेदवारांना आणि जाहिराती प्रसारण करणाऱ्यांना दिले आहेत.
Site Admin | November 18, 2024 6:58 PM | Maharashtra Assembly Election 2024
राज्यात आता प्रचारसभा, मिरवणुका आयोजित करता येणार नाही-निवडणूक अधिकारी कार्यालय
