महिला आणि बालविकास विभाग एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ५ हजार ६३९ अंगणवाडी सेविका आणि १३ हजार २४३ मदतनीस अशी एकूण १८ हजार ८८२ पदे भरणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्रालयात महिला सहकारी संस्था, महिला बचत गट, महिला मंडळ आणि अंगणवाडीबाबतच्या विविध प्रश्नांबाबत तसचं भिवंडी शहरात अंगणवाडी केंद्रांची संख्या वाढवण्याबाबत काल बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी त्या बोलत होत्या. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं होणार असून उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचं आवाहन त्यांनी केलं.
Site Admin | February 13, 2025 4:01 PM | Maharashtra | Women and Child Development Department
महिला आणि बालविकास विभागात १८,८८२ पदांची भरती
