भारतीय राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त फेब्रुवारी महिन्यात राज्यातल्या ६ हजारांहून अधिक महाविद्यालयांत “संविधान गौरव महोत्सवा” अंतर्गत विविध उपक्रमाचं आयोजित केले जाणार आहेत. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली.
या महोत्सवात तज्ञांची व्याख्यानं, निबंध, वक्तृत्व, भित्तीपत्रक स्पर्धा, चर्चासत्रांच्या आयोजनासोबतच जनजागृती अभियानही चालवलं जाणार आहे. राज्यघटनेतल्या मूलभूत मूल्यांचा पुनरुच्चार करणं आणि नागरिकांना त्यांचे घटनात्मक अधिकार आणि कर्तव्यांचं पालन करण्यासाठी प्रेरित करणं, हा या महोत्सवाचा उद्देश आहे.