राज्यात अनधिकृत मासेमारी नौकांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनच्या सहायानं देखरेख ठेवणारी डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणाली राबवायला आजपासून सुरुवात झाली. मत्स्यव्यवसाय आणि बंदरमंत्री नितेश राणे यांनी आज मुंबईतल्या आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्षाचं उद्घाटन केलं. मुंबई शहरात ससून गोदी, मुंबई उपनगरात गोराई, ठाण्यात उत्तन, पालघरमध्ये शिरगाव, रायगड जिल्ह्यात वर्सोली आणि श्रीवर्धन, रत्नागिरीत भाट्ये आणि मिरकरवाडा, तसंच सिंधुदुर्गात देवगड, अशा नऊ ठिकाणी ड्रोनद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे.
Site Admin | January 9, 2025 7:23 PM | Maharashtra
राज्यात डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणाली राबवण्यास सुरुवात
