मुदत संपल्यानं राज्यातल्या सहा जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या एकूण ४४ पंचायती समित्यांवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या जिल्हा परिषदांमध्ये नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार आणि पालघर यांचा समावेश आहे. या सहा जिल्हा परिषदांच्या अंतर्गत येणाऱ्या ४४ पंचायत समित्यांची मुदतही संपल्याने प्रशासक नेमण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी निवडणूक होईपर्यंत प्रशासक म्हणून काम पाहतील.
Site Admin | January 16, 2025 6:53 PM | Maharashtra
राज्यातल्या ६ जिल्हापरिषदा आणि ४४ पंचायती समित्यांवर ‘प्रशासक राज’
