डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

परदेशी गुंतवणुकीत ‘महाराष्ट्र’ अग्रेसर

परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र सातत्याने अग्रेसर राहिला असून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये राज्यात वार्षिक सरासरीच्या सुमारे ९५ टक्के गुंतवणूक आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या आकडेवारीत ही बाब स्पष्ट झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या कालावधीत १ लाख १३ हजार २३६ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक राज्यात झाली. हे प्रमाण गेल्या चार वर्षातल्या सरासरीच्या ९४ पूर्णांक ७१ शतांश टक्के आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, ही घौडदौड अशीच कायम राहील, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा