सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे राज्यात विविध ठिकाणच्या रस्त्यांच्या विकासकामांचं भूमीपूजन आज झालं. या कार्यक्रमाला मंत्री रविंद्र चव्हाण दूरस्थ माध्यमातून उपस्थित होते.
यावेळी २४ जिल्हे आणि ४४ विधानसभा मतदारसंघात १२ हजार ७६८ कोटी रुपये किंमतीच्या १ हजार ४८० किलो मीटर लांबीच्या दु-पदरी सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्यांचं भूमिपूजन झालं.