भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर इथं ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक आज झाली. या बैठकीला राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, नागसेन कांबळे हे देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. महापरिनिर्वाण दिनाची तयारी प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली असून त्यात कोणतीही कमतरता जाणवू नये, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत दिले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांना राहण्यासाठी तंबू, आरोग्य सुविधा, पुरेशी शौचालयं, जेवण्याची तसंच पिण्याच्या पाण्याची सोय, जागोजागी मदत कक्ष स्थापन करावे तसंच येणाऱ्या गर्दीचे योग्य नियोजन करावं असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत दिले.
Site Admin | December 3, 2024 7:12 PM | CM Eknath Shinde | Mahaparinirvana Day