डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार असून पहिल्या टप्प्यात १० मॉल उभारणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत बांद्रा-कुर्ला संकुलात महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शनाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं. राज्यात आगामी कालावधीत एक कोटी लखपती दीदी करण्याचा संकल्प असून मार्चपर्यंत पंचवीस लाख लखपती दीदी करणार आहोत अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. २३ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात एकूण ५०० पेक्षा जास्त स्टॉल लागले आहेत. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा