प्रयागराजमध्ये महाकुंभाबाबत अफवा, चुकीची माहिती, खोट्या आणि जुन्या बातम्या पसरवणाऱ्या समाज माध्यमातल्या खात्यांवर कडक कारवाई करण्यात येत असल्याचं उत्तरप्रदेश पोलिसांनी सांगितलं. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात येत आहे. राज्य सरकार आणि पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याबरोबरच समाजात द्वेष पसरवल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे तसचं नागरिकांनी अफवांकडे लक्ष देऊ नये आणि कोणत्याही संशयास्पद पोस्टची माहिती द्यावी असं आवाहनही केलं आहे.
Site Admin | February 13, 2025 8:11 PM | Mahakumbh 2025
अफवा आणि खोट्या बातम्या पसरवणाऱ्या समाज माध्यमातल्या खात्यांवर कारवाई
