प्रयागराज मध्ये सुरु असलेल्या महाकुंभात आज १० देशांमधून आलेल्या एकूण २१ सदस्यांनी त्रिवेणी संगमात डुबकी मारली. त्यांनी हेलिकॉप्टर मधूनही महाकुंभाच्या गर्दीचं दर्शन घेतलं. या शिष्टमंडळाला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आमंत्रित केलं होतं. या शिष्टमंडळात फिजी, फिनलंड, गयाना, मलेशिया मॉरिशस, सिंगापूर, दक्षिण अफ्रिका, श्रीलंका, त्रिनिदाद आणि टोबॅगो तसचं संयुक्त अरब अमिरातीच्या नागरिकांचा समावेश आहे.
Site Admin | January 16, 2025 8:46 PM | Mahakumbh 2025
महाकुंभात १० देशांमधून आलेल्या एकूण २१ सदस्यांनी त्रिवेणी संगमात स्नान केलं
