उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभ नगरीत गर्दीच्या नियोजनासाठी राज्यसरकारनं वाहनांना प्रवेशबंदीचा कालावधी येत्या ४ फेब्रुवारीपर्यंत वाढवला आहे.
दरम्यान संगमस्थळावर काल झालेल्या चेंगराचेगरीतल्या मृतांची संख्या आता ३० झाली आहे आणि ६० जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. जखमींना मेला रुग्णालयांत दाखल करण्यात आलं आहे. सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी उत्तरप्रदेशचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांनी आज प्रयागराजचा दौरा केला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेच्या न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले असून त्याकरता तीन सदस्यीय आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. माजी न्यायाधीश न्यायमूर्ती हर्ष कुमार यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग काम करेल.