उत्तर प्रदेशात प्रगायराज इथं होणार असलेल्या महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविक आणि यात्रेकरुंच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे १३ हजार गाड्या चालवणार आहे. यात १० हजार नियमित आणि ३ हजार विशेष गाड्यांचा समावेश आहे. कुंभमेळ्या आधी आणि नंतर दोन ते ती अतिरिक्त दिवस असे मिळून ५० दिवस या गाड्या चालवल्या जातील अशी माहिती रेल्वे व्यवस्थापनानं दिली आहे. या मेळाव्याला मोठ्या संख्येनं भाविक आणि यात्रेकरू येण्याची शक्यता गृहीत धरून गर्दी टाळण्यासाठी लोकांची वर्दळ एकमार्गी ठेवण्याचं नियोजन केलं असल्याचंही रेल्वेनं कळवलं आहे.
प्रगायराज इथं येत्या १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत हा महाकुंभ मेळा होणार आहे.