उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं संगमावर सुरु असलेल्या महाकुंभ पर्वाचा उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी समारोप होणार आहे. १४४ वर्षांनी येणाऱ्या या महापर्वात आज दुपारी १२ वाजेपर्यंत ६८ लाखापेक्षा अधिक भाविकांनी स्नान केलं. अमृतस्नान करण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्यानं गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनानं वाहतुकीचं नियमन केलं आहे.
प्रयागराज मध्ये नियमित स्वच्छता केली जात असून भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलं जात असल्याचं जिल्हाधिकारी रवींद्र कुमार मांदर यांनी सांगितलं. दरम्यान, प्रयागराजमधल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत ६३ कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं आहे. काल देशभरातून जवळपास १ कोटी भाविकांनी संगमात पवित्र स्नान केलं.