उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथ महाकुंभ मेळयासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सोईसाठी आणि अतिरिक्त गर्दीच नियंत्रण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काल 4 विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या दुपारी 3 ते रात्री 9 दरम्यान या गाड्या सोडण्यात येणार आहेत. आज पाच गाड्या सोडण्यात येणार आहेत .
दरम्यान, काल महाकुंभ मेळयात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 1 कोटी 36 लाखांपेक्षा जास्त भाविकांनी स्नान केल 13 जानेवारीपासून कालपर्यंत 52 कोटी 83 लाख भाविकांनी स्नान केल्याची नोंद झाली आहे.