उत्तरप्रदेशात प्रयाग राज इथ सुरू असलेल्या महकुंभमेळयाबद्दल सर्वंकष माहिती देण्यासाठी काल नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि उत्तरप्रदेशातील अधिकाऱ्यांनी परदेशातून वार्तांकन करण्यासाठी आलेल्या विविध देशांच्या पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाकुंभ मेळ्याच आध्यात्मिक , सांस्कृतिक आणि आर्थिक महत्व समजावून सांगितलं. जगातील कोणत्याही मोठ्या जागतिक कार्यक्रमांच्या आयोजनात सर्वात जास्त सहभागी होणाऱ्या नागरिकांपेक्षाही जास्त नागरिक म्हणजेच सुमारे ४५ कोटी नागरिक यामध्ये सहभागी होत असून, या दृष्टीने या महकुंभ मेळयाच जागतिक महत्व अधोरेखित होत अशी माहिती उत्तरप्रदेशच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
Site Admin | January 21, 2025 10:03 AM | Mahakumbh Mela 2025
महाकुंभ : परराष्ट्र मंत्रालय आणि उत्तरप्रदेशातील अधिकाऱ्यांचा परदेशी पत्रकारांशी संवाद
