प्रयागराज महाकुंभ इथं असलेल्या संगम घाटाला आज उत्तरप्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार आणि पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी आज भेट दिली. काल चेंगराचेंगरी झालेल्या दुर्घटना स्थळाला त्यांंनी भेट दिली. जखमींवर उपचार सुरु आहेत त्या स्वरुपरानी नेहरु रुग्णालयालाही त्यांनी भेट दिली. संगमाजवळ आखाडा मार्गावर काल झालेल्या चेंगराचेगरीत तीसजण ठार झाले होते. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी उत्तरप्रदेश सरकारने तीनजणांची न्यायिक समिती गठीत केली आहे. या समितीचे सदस्यही उद्या महाकुंभमेळ्याच्या स्थळाला भेट देतील.