सोमवारपासून प्रयागराज इथं सुरू होणाऱ्या महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून विविध वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. मेळ्याच्या ठिकाणी ५ हजार ओपीडी उघडण्यात आल्या असून, यात रोज दहा हजार लोकांना तपासलं जाईल. तसंच तीन लाखापर्यंत चष्म्यांचं वाटप केलं जाणार असून नेत्रदान शिबीरही आयोजित करण्यात येणार आहे. परेड मैदानावरल्या सेंट्रल हॉस्पीटलमध्ये शंभर खाटांची व्यवस्था केली आहे. इथं ओपीडीपासून आयसीयूपर्यंत सर्व सुविधा असतील. अरैल इथले सब सेंट्रल हॉस्पीटल, प्रयागराज जंक्शन, नैनी आणि सुबेदारगंज इथल्या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय निरीक्षण कक्ष उभारण्यात आले आहेत. देशभरातले २४० डॉक्टर महाकुंभमध्ये वैद्यकीय सेवा देणार आहेत.
Site Admin | January 11, 2025 8:23 PM | Mahakumbh Mela 2025
महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून वैद्यकीय सुविधा
