येत्या 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला होणाऱ्या महाकुंभ मेळयाच्या सांगता समारंभाची जय्यत तयारी सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंह आणि पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी प्रयागराज इथे जाऊन महाकुंभ मेळयाच्या या शेवटच्या दिवसाच्या तयारीचा आढावा घेतला. आतापर्यंत 59 कोटी 19 लाखांहून अधिक भाविकांनी महाकुंभात पवित्र स्नान केल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे.
Site Admin | February 22, 2025 10:35 AM | Mahakumbh 2025
महाकुंभ मेळयाच्या सांगता समारंभाची जय्यत तयारी सुरू
