उत्तर प्रदेशातल्या विविध कारागृहांमध्ये असलेल्या कैद्यांना आज त्यांच्या कारागृहाच्या आवारातच प्रयागराज महाकुंभाचं पवित्र स्नान करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
उत्तर प्रदेश सरकारच्या या उपक्रमा अंतर्गत, प्रयागराजमधल्या त्रिवेणी संगमाचं पवित्र पाणी कारागृहाच्या आवारात आणलं जाईल. इच्छूक कैद्यांना त्यांच्या धार्मिक श्रद्धेनुसार या पाण्याने स्नान आणि पूजा करता येईल. सध्या उत्तर प्रदेशच्या तुरुंगात एकंदर ९० हजार कैदी आहेत.