प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्यासाठी रेल्वेने १६ हजार रेल्वेगाड्या चालवल्या. यात जवळपास साडेचार कोटी भाविकांनी प्रवास केल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. ते प्रयागराज जंक्शन इथं आज वार्ताहरांशी बोलत होते. या सोहळ्याची तयारी रेल्वे मागच्या अडीच वर्षांपासून करत असून यासाठी ५ हजार कोटी रुपये खर्च केल्याचं त्यांनी सांगितलं. भाविकांना सुरळितपणे ये जा करता यावी यासाठी महाकुंभ मेळ्सासाठी २१ हून अधिक उड्डाणपूल आणि भुयार बांधले. जीआरपी, पोलीस, आरपीएफ आणि रेल्वेच्या मदतीने या मेळ्याचं यशस्वी आयोजन झालं असं वैष्णव म्हणाले. यंदाचा महाकुंभ मेळा श्रद्धा आणि एकतेचं प्रतीक होता असं वैष्णव म्हणाले.
Site Admin | February 27, 2025 1:05 PM | Mahakumbh 2025
महाकुंभ मेळ्यासाठी रेल्वेने १६ हजार रेल्वेगाड्या चालवल्या – रेल्वेमंत्री
