महाकुंभ हा देशाच्या एकतेचा महायज्ञ असून देशाला त्याच्या हजारो वर्षाच्या परंपरेचा गर्व आहे. देश एका नव्या ऊर्जेसह पुढे जात आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रयागराजमध्ये महाकुंभाची सांगता झाल्यानंतर आज प्रधानमंत्र्यांनी आपल्या भावना त्यांच्या समाजमाध्यमावरच्या ब्लॉगमध्ये व्यक्त केल्या. देशाचं नवं भविष्य लिहिण्याचा हा काळ आहे. महाकुंभाला आलेले कोट्यावधी लोक हा केवळ एक विक्रम नसून तो समृद्ध भारतीय परंपरेचा पाया आहे. येणाऱ्या शतकांमध्ये देशाची परंपरा आणि भारतीय संस्कृती अधिक समृद्ध आणि सशक्त होईल. महाकुंभाचे यशस्वी आयोजन हे व्यवसायिक आयोजक आणि धोरणकर्त्यांसाठी एक अभ्यासाचा विषय असून जगात इतक्या मोठ्या प्रमाणात कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन केलं जात नाही असंही त्यानी सांगितल.
Site Admin | February 27, 2025 9:10 PM | Mahakumbh 2025 | PM Narendra Modi
महाकुंभ हा देशाच्या एकतेचा महायज्ञ असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार
