महाकुंभ मेळाव्यासाठी प्रशासकीय आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज होत्या. भारतीय रेल्वेनं देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांसाठी जादा गाड्यांची व्यवस्था केली. आज सकाळी ९ वाजेपर्यंत प्रयागराज मधल्या विविध स्थानकांवरुन मिळून ११५ गाड्या रवाना झाल्या. या गाड्यांमधून सहा लाखापेक्षा जास्त भाविकांनी प्रवास केला असं रेल्वे मंत्रालयाने सांगितलं. आज दिवसभरात सुमारे साडेतीनशे गाड्या सोडण्यात येतील. काल ३१४ गाड्यांमधून १४ लाखापेक्षा जास्त भाविक रवाना झाले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सतीश कुमार रेल्वे व्यवस्थापनावर सतत लक्ष ठेवून आहेत.
Site Admin | February 26, 2025 1:33 PM | Mahakumbh 2025
MahaKumbh 2025 : भाविकांसाठी विशेष रेल्वेगाड्यांची सोय
