उत्तरप्रदेशमधील प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमध्ये आतापर्यंत 60 कोटी 74 लाखांहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं आहे. या भव्य मेळ्यात अजूनही दररोज लाखो भाविकांचा ओघ सुरू आहे. केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, केंद्रीय आरोग्य मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांसारख्या अनेक नामवंत व्यक्तींसह काल दिवसभरात एकंदर 43 लाख लोकांनी पवित्र स्नान केल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
Site Admin | February 23, 2025 10:06 AM | Mahakumbh 2025
महाकुंभमध्ये ६० कोटी ७४ लाखांहून अधिक भाविकांचं पवित्र स्नान
