प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यामध्ये भाविकांसाठी उभारण्यात आलेलं आणि तब्बल ४० हजार चौरस फूट क्षेत्रात विस्तारलेलं स्वच्छ सुजल गाव संपूर्ण देशासाठी आदर्श ठरलं आहे. विविध सरकारी उपक्रम इथं कार्यान्वित करण्यात आल्यानं हे गाव उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागातील परिवर्तनाचं समग्र दर्शन घडविणारं ठरलं आहे. राज्य सरकारनं केलेल्या ऐतिहासिक सुधारणांमुळे बदललेल्या गावांचं दर्शन घडविणाऱ्या राज्याच्या यशोगाथेची झलक या प्रदर्शनात पर्यटकांना पाहायला मिळते. बांदा, झाशी, चित्रकूट, ललितपूर आणि महोबा यासह बुंदेलखंडातील पाणीटंचाईच्या समस्येवर कशा प्रकारे तोडगा काढण्यात आला आहे, हे या नमुना गावानं दाखवून दिलं आहे. भेटीदरम्यान पाहुण्यांना ‘जल प्रसाद’ किंवा पाण्याचा प्रसाद दिला जातो. गावात दररोज सायंकाळी विविध कार्यक्रम, प्रदर्शने आणि दररोज गंगा आरती होत आहे. गावातील माहिती हिंदी,इंग्रजी, बंगाली, तेलुगू आणि मराठी अशा पाच भाषांमध्ये उपलब्ध आहे. देशभरातील पर्यटकांना उत्तर प्रदेशात होत असलेलेबदल अवगत व्हावेत, हाच यामागचा हेतू आहे या महिन्याच्या २६ तारखेपर्यंत पर्यटकांसाठी खुलं राहणार आहे.
Site Admin | February 17, 2025 9:40 AM | Mahakumbh 2025
MahaKumbh 2025 : भाविकांसाठी उभारण्यात आलेलं सुजल गाव संपूर्ण देशासाठी आदर्श
