प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये लाखो भाविकांना सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्न मिळावं यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं कठोर उपाययोजना लागू केल्या आहेत. महाकुंभ क्षेत्रात अन्न विश्लेषकांसह १० फिरत्या अन्न चाचणी प्रयोगशाळा तैनात करण्यात आल्या असून त्यात हॉटेल्स, ढाबे आणि खाद्यपदार्थांच्या छोट्या स्टॉलच्या खाद्यपदार्थांची भेसळ आणि गुणवत्ते संदर्भात तपासणी केली जात आहे. हा मेळावा ५ झोन आणि २५ सेक्टरमध्ये विभागण्यात आला असून स्वच्छता आणि सुरक्षा मानकांवर नियमित लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक सेक्टरमध्ये अन्न सुरक्षा अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.
Site Admin | January 20, 2025 1:51 PM | Mahakumbh 2025