प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याच्या शेवटच्या आठवड्यात, प्रवासी वाहतुकीत झालेली वाढ नियंत्रित करण्यासाठी भारतीय रेल्वे सज्ज झाली आहे. प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी रेल्वेनं स्थानकाच्या बाहेर अतिरिक्त विशेष व्यवस्था तयार केली आहे.
प्रवाशांना त्यांच्या गाड्यांच्या सुटण्याच्या नियोजित वेळेनुसार स्थानकावर प्रवेश दिला जात आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर गेल्या शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर, भारतीय रेल्वेनं अनेक कडक उपाययोजना लागू केल्या आहेत. अयोध्या, वाराणसी, गाझियाबाद, नवी दिल्ली आणि आनंद विहारसह महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त रेल्वे संरक्षण दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.