येत्या २९ तारखेला मौनी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी होण्याची शक्याता लक्षात घेऊन महाकुंभ मेला क्षेत्र वाहनविरहित क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे. गर्दीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तसंच जास्त गर्दी होणार नाही याची खात्री करण्यासाठी एकात्मिक नियंत्रण आणि सूचना केंद्र सक्रिय करण्यात आलं आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी जास्त गर्दी असलेल्या भागात जलद प्रतिसाद पथकं तैनात करण्यात आली आहेत.
महाकुंभ मेळ्याचं औचित्य साधून महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या वतीनं महिला सक्षमीकरण आणि महिलांचे अधिकार याविषयी जनजागृती करणारी दालनं उभारली आहेत. याबरोबरच देशभरातील कलाकारांनी तयार केलेली हस्तकला, विविध कलाकृती असलेली वस्त्र, जैविक उत्पादनं विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
दरम्यान, केंद्रिय गृहमंत्री अमित शहा आज उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभ मध्ये सहभागी होणार आहेत. त्रिवेणीसंगमावर स्नान केल्या नंतर ते पुरी आणि द्वारका येथील शंकराचार्यांची तसंच इतर संतांची भेट घेणार आहेत.