प्रयागराज इथल्या महाकुंभमुळे देशभरातल्या कारागीरांना सुवर्णसंधी प्रदान झाली आहे. इथल्या संगमांवर एक जिल्हा एक उत्पादन संकल्पनेवरील भव्य प्रदर्शन, सहा हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारण्यात आल्याची माहिती आकाशवाणीच्या प्रतिनिधीने दिली आहे. फिरोजाबादमधील कार्पेट, जरी उत्पादने, काचेची खेळणी, वाराणसीतील लाकडी खेळण्यांचे उत्पादने भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र बनत आहेत. आकाशवाणीशी बोलताना, प्रयागराज विभागाचे सहआयुक्त उद्योग शरद टंडन यांनी प्रदर्शनात विविध उत्पादने प्रदर्शित करणारे सुमारे 140 स्टॉल उभारण्यात आल्याची माहिती दिली.
Site Admin | January 20, 2025 1:51 PM | Maha Kumbh 2025
महाकुंभ मेळ्यामुळे देशभरातल्या कारागीरांना सुवर्णसंधी
