डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 19, 2025 8:32 PM | Maha Kumbh 2025

printer

महाकुंभ मेळ्यातल्या प्रभाग क्रमांक १९मध्ये भीषण आग

प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यातल्या प्रभाग क्रमांक १९मध्ये आज दुपारी भीषण आग लागली. प्रशासनानं तातडीनं आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि तपशीलवार माहिती घेतली. आदित्यनाथ यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आणि मदतकार्य युद्धपातळीवर करायचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा