विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक आज मुंबईत विधानभवनात झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, जितेंद्र आव्हाड, डॉ. नितीन राऊत, अमिन पटेल उपस्थित होते. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या.
Site Admin | February 23, 2025 3:03 PM | Assembly and Legislative Council
विधानभवनात विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक
